तालिन विमानतळ (एस्टोनियन: Tallinna lennujaam) (आहसंवि: TLL, आप्रविको: EATN) हा एस्टोनिया देशाच्या तालिन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. एस्टोनिया देशातील सर्वात वर्दळीचा असलेला हा विमानतळ तालिन शहराच्या ५ किमी आग्नेयेस स्थित आहे. २० सप्टेंबर १९३६ रोजी वाहतुकीस खुला करण्यात आलेला तालिन विमानतळ २००८ साली मोठ्या प्रमाणावर पुनर्विकसित करण्यात आला. २००९ साली ह्या विमानतळाला स्वतंत्र एस्टोनियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष लेनार्ट मेरी ह्यांचे नाव देण्यात आले. आजच्या घडीला हा विमानतळ एअरबाल्टिक व एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स ह्या दोन कंपन्यांसाठी प्रमुख वाहतूकतळ आहे. येथून एरोफ्लोत, एअरबाल्टिक, बेलाव्हिया, फिनएअर, लुफ्तान्सा, स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्स इत्यादी प्रमुख कंपन्यांद्वारे युरोपातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा पुरवली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तालिन विमानतळ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.