सिनसिनाटी/उत्तर केंटकी आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Cincinnati/Northern Kentucky International Airport; IATA: CVG) हा अमेरिकेच्या सिनसिनाटी शहरामधील विमानतळ आहे. हा विमानतळ केंटकी राज्याच्या उत्तर भागात केंटकी-ओहायो-इंडियाना ह्या तिहेरी सीमेजवळ स्थित आहे.
इ.स. १९४४ साली लष्करी उपयोगासाठी उघडला गेलेला हा विमानतळ १९४७ मध्ये नागरी सेवेसाठी खुला करण्यात आला. डेल्टा एरलाइन्स ह्या प्रमुख विमान वाहतूक कंपनीचा येथे हब आहे. आजच्या घडीला अमेरिकेसह युरोप, कॅनडा इत्यादी भागांतील एकूण ५९ शहरांना येथून प्रवासी सेवा पुरवण्यात येते.
सिनसिनाटी/उत्तर केंटकी आंतरराष्ट्रीय विमानतळ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.