तारा चंद (१७ जून १८८८, सियालकोट - १४ ऑक्टोबर १९७३) हे भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारताच्या प्राचीन इतिहास आणि संस्कृतीत तज्ञ असलेले इतिहासकार होते. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात अध्यापन केले आणि १९४० च्या दशकात कुलगुरू म्हणून काम केले.
चंद यांनी १९२२ मध्ये ऑक्सफर्डच्या क्वीन्स कॉलेजमधून डी.फिल. केली. "भारतीय संस्कृतीवर इस्लामचा प्रभाव" या विषयावरील प्रबंध त्यांनी सादर केला होता. चंद नंतर इराणमध्ये भारताचे राजदूत, आणि भारत सरकारमध्ये शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होते.
चंद यांच्या स्मरणार्थ अलाहाबाद विद्यापीठाने डॉ.तारा चंद वसतिगृहाची स्थापना केली. विद्यापीठाची माजी विद्यार्थी संघटना त्यांच्या नावाने वार्षिक शिष्यवृत्ती देते.
तारा चंद (पुरातत्वशास्त्रज्ञ)
या विषयातील रहस्ये उलगडा.