तारा चंद (हिमाचल प्रदेश राजकारणी)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

तारा चंद हे भारतीय राजकारणी होते. १९६२ मध्ये जोगिंदरनगर मतदारसंघातून ते हिमाचल प्रदेश प्रादेशिक परिषदेवर निवडून आले. परिषदमध्ये निवडून आलेले ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव उमेदवार होते. नंतर परिढदेचे हिमाचल प्रदेश विधानसभेत रूपांतर झाले. १९६४ मध्ये जेव्हा कम्युनिस्ट पक्ष फुटला तेव्हा तारा चंदने भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)ची बाजू घेतली. १९७८ मध्ये त्यांची सीपीआय(एम) हिमाचल प्रदेश राज्य समितीचे सचिव म्हणून निवड झाली. त्यांनी हिमाचल प्रदेश किसान सभेचे अध्यक्ष म्हणून काम केले.

१९९० च्या उत्तरार्धात तारा चंद यांचे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →