दक्षिणी तळलेली कोंबडी, ज्याला फक्त तळलेली कोंबडी म्हणूनही ओळखली जाते. यात कोंबडीचे तुकडे आवरण लावून तलात खोल तळतात किंवा पॅनमध्ये कमी तेलात तळतात किंवा उच्च दाब देउन तळतात. कोंबडीच्या बाह्य भागात ब्रेडक्रम्स लावल्याने कोंबडीच्या मांसांत रस टिकुन राहतो आणि आवरण मस्त कुरकुरीत होते. या पदार्थासाठी बहुधा ब्रॉयलर कोंबडीचा वापर केला जातो. गावठी कोंबडीत मांस कमी असल्याने तिचा वापर टाळतात.
पाश्चिमात्य इतिहासात खोल तळलेले पदार्थ म्हणून ओळखली जाणारी प्रथम अन्नपदार्थ म्हणजे फ्रिटर्स, हे युरोपियन मध्ययुगात लोकप्रिय होते. तथापि, युरोपियन लोकांमध्ये स्कॉटिश लोकांनी प्रथम कोंबडी तेलामध्ये तळली होती. त्यावेळेस त्यांनी तिला कुठलेही आवरण न लावता तळली होती. त्या दरम्यान, पश्चिम आफ्रिकन लोकांपैकी बऱ्याचजणांना तळलेली कोंबडी हा अन्नपदार्थ अवगत होता. आफ्रिकन लोक यासाठी पाल्म तेल वापरत असे. अमेरिकेच्या दक्षिणेकडील गुलाम असलेल्या आफ्रिकन आणि आफ्रिकन-अमेरिकन लोकांद्वारे स्कॉटिश तळण्याचे तंत्र आणि पश्चिम आफ्रिकन आवरणाचे तंत्र एकत्र केले आणि हा नवीन अन्नपदार्थ बनवला.
तळलेली कोंबडी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.