कडकनाथ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कडकनाथ

कडकनाथ ही कोंबड्याची एक प्रजाती आहे. या जातीचे स्थानिक नांव "कालामासी" असे आहे, ज्याचा अर्थ काळे मांस असलेली कोंबडी. संपूर्ण काळ्या रंगाच्या या कोंबडीचे रक्त आणि मांसही काळे असते. मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्हे आणि राजस्थान तसेच गुजरातलगतचे जिल्हे मिळून अंदाजे ८०० चौरस मैलांचा प्रदेश या जातीचे मुळ उगमस्थान समजले जाते. आदिवासी, स्थानीय निवासी आणि ग्रामीण गरीब लोक बहुतांशी या जातीच्या कोंबड्या पाळतात. हा पक्षी पवित्र समजला जातो आणि दिवाळीनंतर देवीला त्याचा बळी चढवला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →