तमोरा पियर्स

यामागील विज्ञान आणि इतिहास.

तमोरा पियर्स (जन्म 13 डिसेंबर 1954) या किशोरवयीन मुलांसाठी कल्पनारम्य कथा लिहिणाऱ्या अमेरिकन लेखिका आहेत. तरुण नायिकांच्या कथांसाठी त्या प्रसिद्ध आहेत. पहिली पुस्तक मालिका, दि सॉन्ग ऑफ दि लायनेसमुळे (1983-1988) त्या प्रसिद्ध झाल्या. सैनिक म्हणून प्रशिक्षणाच्या चाचण्या देणारी आणि विजय मिळविणारी अॅलेना ही यातील मुख्य पात्र आहे.

पियर्स यांनी २०१३ मध्ये अमेरिकन लायब्ररी असोसिएशन अंतर्गत यंग अॅडल्ट लायब्ररी सर्व्हिसेस असोसिएशन (याल्सा) कडून दिला जाणारा मार्गारेट ए. एडवर्ड्स अवॉर्ड जिंकला. हा पुरस्कार त्यांच्या सॉन्ग ऑफ दि लायनेस आणि प्रोटेक्टर ऑफ दि स्मॉल (१९९९-२००२) या कामाची दखल यासाठी घेतली गेली."किशोरवयीन मुलांच्या साहित्यात अत्यंत महत्वपूर्ण आणि मोलाची भर घालणाऱ्या" लेखकाला आणि त्यांच्या विशिष्ट कार्याला दिला जाणारा हा वार्षिक अवॉर्ड आहे.

पियर्स यांची पुस्तके वीस भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →