व्हेनेसा पॅरॅडिस

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

व्हेनेसा पॅरॅडिस

व्हेनेसा शांटाल पॅरॅडिस (२२ डिसेंबर, १९७२:से-मॉर-दे-फॉसे, व्हाल-दे-मार्न, फ्रांस - ) एक फ्रेंच गायिका, मॉडेल आणि अभिनेत्री आहे. पॅरॅडिस १९८७मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी तिच्या ज्यो ले टॅक्सी (१९८७) या गाण्याला अभूतपूर्व यश मिळाल्याने प्रसिद्ध झाली. वयाच्या १८व्या वर्षी तिला प्रि रोमी श्नाइडर आणि सर्वाधिक नवीन अभिनेत्री गायिका आणि अभिनेत्री म्हणून फ्रांसचे सर्वोच्च सन्मान मिळाले. तिच्या सर्वात उल्लेखनीय चित्रपटांमध्ये जरार्ड डेपार्ड्यू सोबतचा एलिसा (१९९५), ज्याँ रेनो बरोबरचा विच वे लव्ह (१९९७) ज्याँ-पॉल बेलमोंडो आणि अलैन देलाँ बरोबरचा अन चान्स सुर ड्यूक्स (१९९८) १५] यांचा समावेश आहे. १९९५च्या कान चित्रपट महोत्सवात तिने ज्याँ मॉरोला दिलेली श्रद्धांजली फ्रांसमध्ये प्रसिद्ध झाली. या दरम्यान तिने ले तूर्बियाँ हे गाणे गायले. २०२२ मध्ये तिला ममन या नाटकातील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी मोलिए पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

पॅरॅडिसने अनेक आणि गीतकारांशी जवळचे संबंध ठेवून त्यांच्या बरोबर संगीतसंच तयार केले. यात एटियें रोडा-गिल (१९८८), सर्ज गेन्सबर्ग (१९९०), लेनी क्रॅवित्झ (१९९२), मॅथ्यू चेडिड (२००७) आणि बेंजामिन बायोले, सॅम्युएल बेंचेत्रि (२०१३) यांचा समावेश आहे. पॅराडिस जगभरातील ३००पेक्षा अधिक मासिकांच्या मुखपृष्ठांवर दिसली आहे. यांत व्होग, एल, हार्पर बझार, मदाम फिगारो, व्हॅनिटी फेर, ग्लॅमर, प्रीमियेर आणि मेरी क्लेर यांचा समावेश आहे.

पॅरॅडिसला २०११मध्ये ऑर्डर दे आर्ट्स ए दे लेटर्स ची अधिकारपद दिले गेले तसेच २०१५ मध्ये ऑर्डर दे ला नॅशनल दे ला लेजाँ द'ऑनोर मध्ये शेव्हालिये (सरदार) पद दिले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →