गाय एडवर्ड पियर्स (५ ऑक्टोबर, १९६७:इलाय, कँब्रिजशायर, इंग्लंड - ) हा ऑस्ट्रेलियन अभिनेता आहे. याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असला तरी हा ऑस्ट्रेलियाच्या गीलाँग शहरात वाढला.
पियर्सने आपली अभिनय कारकीर्द ऑस्ट्रेलियातील दूरचित्रवाणीमालिका नेबर्स या दूरचित्रवाणीमालिकेपासून केली.
यानंतर त्याने द टाइम मशीन (२००२). कॉर्मॅक मॅककार्थीच्या द रोड (२००९), कॅथरीन बिगेलोचा युद्धपट द हर्ट लॉकर (२००९) आणि टॉम हूपरच्या इतिहासपट द किंग्स स्पीच (२०१०) या चित्रपटांमध्ये काम केले. याव्यतिरिक्त पियर्स रिडले स्कॉटच्या प्रोमिथियस (२०१०), मार्वल अॅक्शन फिल्म आयर्न मॅन ३ (२०१३) सारख्या चित्रपटांतूनही दिसला आहे.
इंडीवायरने पियर्सला अकादमी पुरस्कार नामांकन न मिळालेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून नाव दिले.
गाय पियर्स
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.