डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (लेह)

या विषयावर तज्ञ बना.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (लेह)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा २०१६ मध्ये उभारलेला लडाखमधील लेह येथे स्थित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा भारतातील सर्वाधिक उंच स्थानी असलेला पुतळा समजला जातो. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ जुलै २०१६ रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा असून नागपूरातून आणण्यात आला आहे. देशी-विदेशी लोकांना डॉ. आंबेडकरांच्या कार्यांची आणि विचारांची माहिती व प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुतळा बसवण्यात आला आहे. २१ ऑगस्ट २०१७ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पुतळ्याला भेट दिलेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →