डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (समतेचा पुतळा किंवा स्टॅचू ऑफ इक्वालिटी) हे मुंबई, महाराष्ट्रातील निर्माणाधीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आहे. हे स्मारक भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ आहे. येथे १३७.३ मीटर (४५० फूट) उंच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला जात आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबर २०१५ रोजी स्मारकाचे भूमिपूजन केले. मे २०२६ मध्ये या स्मारकाचे बांधकाम पूर्ण होईल, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये या स्मारकाचे ५० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे पुरस्कर्ते असल्यामुळे त्यांच्या या पुतळ्याला "स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी" अर्थात "समतेचा पुतळा" असे नाव देण्यात आले आहे. आंबेडकरांचे समाधीस्थळ चैत्यभूमी येथून जवळच आहे. या स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ ४८,४१४.८३ चौरस मीटर (साडे १२ एकर) असून स्मारकासाठीचा खर्च सुमारे १००० कोटी रुपये इतका येण्याचा अंदाज आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटी (१८२ मीटर) आणि स्प्रिंग टेंपल बुद्ध (१५३ मीटर) यांच्यानंतर आंबेडकरांचा समतेचा पुतळा हा जगातील तिसरा सर्वाधिक उंचीचा पुतळा असेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि न्यायासाठी लढा दिला आणि भारतातील कोट्यवधी शोषीत जनतेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला, त्यामुळे आंबेडकरांना समतेचे प्रतिक असे म्हणले जाते.
समतेचा पुतळा
थोडक्यात पण महत्त्वाचे.