भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक किंवा क्रांतिभूमी हे महाराष्ट्रातील महाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले एक राष्ट्रीय स्मारक आहे. आंबेडकरांनी १९२७ साली महाडमध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन केले होते. या दोन ऐतिहासिक घटनांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून महाराष्ट्र शासनाने चवदार तळे सौंदर्यीकरण आणि २००४ साली या राष्ट्रीय स्मारकाची उभारणी केली. सध्या हे स्मारक समाज कल्याण विभागाच्या अखत्यारीत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) त्याची देखरेख करते. या स्मारकाची वास्तू व इतर घटक सध्या बिकट अवस्थेत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (महाड)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.