चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे. येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते. तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चवदार तळे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.