बापूसाहेब उपाख्य गंगाधर नीळकंठ सहस्रबुद्धे (अज्ञात - १९५८) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म एका मराठी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला होता आणि ते सोशल सर्विस लीगशी संबंधित होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी होते. महाड नगरपालिकेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस व अनंतराव विनायक चित्रे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांसह, महाड सत्याग्रह दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्यास ते मोलाचे काम करीत होते. सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी मनुस्मृती हा ग्रंथ जाळला. नंतर ते आंबेडकरांच्या 'जनता' या साप्ताहिकात संपादक झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गंगाधर सहस्रबुद्धे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.