सुरेंद्रनाथ गोविंद टिपणीस हे १९०० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात महाड नगरपालिकेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म मराठी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला होता. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी होते. गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे व अनंतराव विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांसह, महाड सत्याग्रह दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते. त्यांनी महाडची सार्वजनिक जागा अस्पृश्यांसाठी खुली जाहीर केली आणि १९२७ मध्ये आंबेडकरांना महाड येथे बैठक घेण्याचे आमंत्रण दिले. नंतर ते आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार झाले. त्यांना 'दलितमित्र' आणि 'नानासाहेब' ह्या पदव्या दिल्या गेल्या.
टिपणीस हे महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या वेळी महाड नगर परिषदेचे अध्यक्ष होते. सार्वजनिक पाणवठ्यावर अस्पृश्यांना पाणी भरण्याचा अधिकार देणारा मुंबई विधान सभेच्या ठरावाची अमंलबजावणी महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत करण्याचा ठराव त्यांनी महाड नगरपरीषदेत मंजूर करून घेतला.
ते आणि त्यांचे मामा अनंतराव विष्णू चित्रे यांनी खोती विरोधी आंदोलनाचे दरम्यान आपल्या जमिनदारी अधिकारांचा त्याग करून बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला.
सुरेंद्रनाथ टिपणीस
यामागील विज्ञान आणि इतिहास.