डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (इंग्रजी: Dr. Ambedkar National Memorial) हे २६ अलीपूर रोड, दिल्ली येथील राष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. हे बाबासाहेबांचे निवासस्थान होते व येथेच त्यांचे इ.स. १९५६ मध्ये महापरिनिर्वाण/निधन झाले होते, त्यामुळे याला महापरिनिर्वाण भूमी किंवा महापरिनिर्वाण स्थळ म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन व लोकार्पन करण्यात आले. स्मारकातील इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे. स्मारकाला सुमारे २०० कोटी रुपये एवढा खर्च लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत पंचतीर्थ म्हणजेच पाच स्थळांचा विकास करण्याचं केंद्र आणि स्थानिक राज्य सरकारनं ठरवलं आहे, त्यापैकी हे स्मारक एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
थोडक्यात पण महत्त्वाचे.