डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक (इतर नावे डॉ. आंबेडकर हाऊस लंडन आणि शिक्षण भूमी) हे युनायटेड किंग्डमच्या वायव्य लंडनमधील १० किंग हेनरी मार्गावर असलेले आंतरराष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ नोव्हेंबर २०१५ रोजी स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना त्यांनी इ.स. १९२१-२२ दरम्यान येथे वास्तव केलेले होते. इमारतीत त्यांनी कठोर परिश्रमाणे २१-२१ तास अभ्यास करून एम.एस्सी, बार-ॲट-लॉ, डी.एस्सी. अशा तीन अत्युच्च पदव्या संपादन केल्या होत्या. हे स्मारक तीन मजली असून त्याचे क्षेत्रफळ २०५० चौरस फुट आहे. या वास्तुवर "डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६), सामाजिक न्यायाचे भारतीय पुरस्कर्ते, यांनी १९२१-२२ मध्ये येथे वास्तव्य केले" अशी अक्षरे कोरलेली आहेत. याच वास्तूचे रूपांतर आज जागतिक स्मारकात झाले असून हे स्मारक जगासाठी प्रेरणास्थान ठरले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →