डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा किंवा भव्य स्मारकशिल्प (Monument memorial) हा नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात इ.स. १९६७ मध्ये उभारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पंचधातूचा पुतळा आहे. आंबेडकरी समाजाने लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला आहे. आंबेडकरांचे हे स्मारकशिल्प चौथऱ्याशिवाय एकूण १२.५ फूट उंचीचे आहे.
१४ एप्रिल म्हणजेच डॉ. आंबेडकर जयंती दिनी व ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा व राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, राज्यपाल इत्यादी नेते व जनता डॉ. आंबेडकरांना स्मरून या पुतळ्याला अभिवादन करत असतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (भारतीय संसद)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!