डंकर्कची लढाई

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

डंकर्कची लढाई

डंकर्कची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी व दोस्त राष्ट्रांच्या सैन्यात झालेली लढाई होती. २६ मे ते ४ जून, इ.स. १९४० दरम्यान फ्रांसच्या डंकर्क शहराजवळ झालेल्या या लढाईत जर्मनीचा विजय झाला व दोस्त सैन्याने घाईघाईत इंग्लिश चॅनलपल्याड इंग्लंडमध्ये पळ काढला. कोंडीत पकडले गेलेले हे सैनिक जर सुटले नाही तर युनायटेड किंग्डमच्या सरकारने जर्मनीसमोर शरणागती पत्करण्याची तयारी केली होती. अंदाजे ३ लाख सैनिकांनी या ९ दिवसांत मिळेल त्या साधनाने समुद्र पार केला व ही परिस्थिती टाळली. फ्रेंच सैन्याच्या ६०,००० सैनिकांपैकी २६,००० दोस्तांबरोबर इंग्लंडला आले तर उरलेल्यांनी जर्मन सैन्यासमोर शरणागती पत्करली. दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सचा पाडाव होण्याची ही नांदी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →