इंग्लंडचा क्रिकेट संघ ९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २००८ दरम्यान २-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता.
२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यांमुळे शेवटचे २ एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आणि भारताने एकदिवसीय मालिका ५-० अशी जिंकली.
मुंबई हल्ल्यांमुळे अहमदाबाद आणि मुंबई येथील कसोटी सामने चेन्नई आणि मोहाली येथे हलवण्यात आले. सुरुवातीला इंग्लंडचा संघ मायदेशी परतला आणि त्यानंतर अबु धाबी येथे प्रशिक्षणसाठी गेला. ७ डिसेंबर रोजी इंग्लंड संघाने २ कसोटी मालिकेमध्ये भाग घेण्याचे ठरवले. आणि दुसऱ्याच दिवशी संघ चेन्नईमध्ये दाखल झाला.
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००८-०९
थोडक्यात पण महत्त्वाचे.