ज्योती एकनाथ गायकवाड या महाराष्ट्रातील भारतीय राजकारणी आहेत. त्या 2024 पासून महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य आहेत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्या म्हणून धारावीचे प्रतिनिधित्व करतात.
गायकवाड 2024च्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या धारावी विधानसभा मतदारसंघातून 15 व्या महाराष्ट्र विधानसभेवर प्रथमच निवडून आल्या. यापूर्वी ज्योती गायकवाड यांच्या बहिण आणि विद्यमान खासदार वर्षा गायकवाड धारावी विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आल्या होत्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड या उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदार झाल्या.
ज्योती गायकवाड या आंबेडकरी बौद्ध समाजातील आहेत. त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे देखील तीन वेळा खासदार होते. 15व्या महाराष्ट्र विधानसभेत, त्या महाविकास आघाडीच्या एकमेव महिला आमदार आहेत. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ज्योती गायकवाड यांनी 70,727 मते मिळवली आणि शिंदे गटाचे शिवसेना उमेदवार राजेश शिवदास खंदारे यांचा 23,459 मतांनी पराभव केला.
ज्योती गायकवाड
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.