वर्षा गायकवाड

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वर्षा एकनाथ गायकवाड ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. २०१९ साली त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.

प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत. काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या असून त्यांना वडिलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या. ३ फेब्रुवारी १९७५ रोजी, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका बौद्ध कुटुंबात झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →