ज्योती आमगे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

ज्योती आमगे

ज्योती किशनजी आमगे (जन्म:१६ डिसेंबर, १९९३) ह्या एक भारतीय अभिनेत्री असून त्या गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स नुसार जगातील सर्वात कमी उंचीच्या जीवित महिला म्हणून प्रसिद्ध आहेत.

ज्योतीचा जन्म १६ डिसेंबर १९९३ रोजी किशनजी आणि रंजना आमगे यांच्या पोटी नागपूर येथे झाला. ज्योतीची पूर्ण उंची ६२.८ सेंटीमीटर (म्हणजे दोन फुटापेक्षा किंचित जास्त) इतकी आहे. त्यांची उंची कमी असण्यामागे अकॉड्रोप्‍लासिया नावाचा आजार कारणीभूत आहे. ही उंची चार महिन्याच्या बाळा इतकी आहे असे मानले जाते.

१६ डिसेंबर २०११ रोजी आमगेच्या १८ व्या वाढदिवशी, त्यांना अधिकृतपणे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे ६२.८ सेंटीमीटर (२फूट ३/४इंच) उंचीसह जगातील हयात असलेली सर्वात लहान महिला म्हणून घोषित करण्यात आले.



इ.स. २०१२ मध्ये, त्या नेपाळच्या चंद्र बहादूर डांगी या जगातील सर्वात लहान माणसाला भेटल्या. गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ५७ व्या आवृत्तीसाठी या जोडीने एकत्र पोझ दिली होती.

लोणावळा येथील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम मध्ये आमगे यांचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →