ज्ञानेश्वर काटके (१९७७ - ), उर्फ माऊली आबा काटके, हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघातून १५ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. हे २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडून गेले.
काटके यांनी १९९५मध्ये श्री शिवाजी मराठा मेमोरियल ऑफ सोसायटी, पुणे, महाराष्ट्र येथून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली.
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काटके यांनी शिरूर विधानसभा मतदारसंघात १९२,२८१ मते मिळाली आणि त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप)चे अशोक रावसाहेब पवार यांचा ७४,५५० मतांनी पराभव केला. काटके शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष होते आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये निवडणुकीपूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले
ज्ञानेश्वर काटके
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!