बाळासाहेब मांगुळकर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर (४ डिसेंबर, १९५८:यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे १५व्या विधानसभेवर निवडून गेले.

मांगुळकर हे यवतमाळ शहराजवळील भारी या छोट्याशा गावातील आहेत. त्यांचे वडील शंकरराव बळीरामजी मांगुळकर शेतकरी होते. त्यांनी यवतमाळ येथील अँग्लो हिंदी हायस्कूलमधून बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते सलग तीन वेळा राज्यसभा सदस्य राहिलेले विजय दर्डा आणि त्यांचे दिवंगत वडील महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी चार वेळा सदस्य आणि कॅबिनेट मंत्री जवाहरलाल दर्डा आणि यवतमाळच्या दर्डा कुटुंबाचे जवळचे सहकारी मानले जातात. मांगुळकर यवतमाळचे माजी आमदार दिवंगत निलेश देशमुख पारवेकर यांचेही जवळचे मित्र होते.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मांगुळकर यांचा भाजपच्या मदन येरावार यांच्याकडून २,२५३ मतांनी पराभव झाला. परंतु २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी यवतमाळमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत पुढील निवडणूक जिंकली. त्यांनी ११७,५०४ मते मिळवली आणि त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे मदन येरावार ११,३८१ मतांनी पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →