सई प्रकाश डहाके

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सई प्रकाश डहाके (१९६४ - ) या महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. त्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातून २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षातर्फे १५व्या विधानसभेवर निवडून गेल्या.

या कारंजा मतदारसंघाचे माजी आमदार दिवंगत प्रकाश उत्तमराव डहाके यांच्या पत्नी आहेत. त्यांनी अमरावती येथील लेडीज हायस्कूलमध्ये बारावीचे शिक्षण घेतले आणि १९८२ मध्ये उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी शिक्षण सोडले.

डहाके २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षा तर्फे उभ्या राहिल्या. त्यांना ८५,००५ मते मिळाली आणि त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (सपा) विद्यमान आमदार पुत्र ग्यायक राजेंद्र पटणी यांचा ३५,०७३ मतांनी पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →