जोहान्सबर्ग

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

जोहान्सबर्ग

जोहान्सबर्ग हे दक्षिण आफ्रिकेतील सगळ्यात मोठे शहर आहे. हे शहर ग्वाटेंग प्रांताची राजधानी आहे. या शहरास जोबर्ग असेही म्हणतात.

जोहान्सबर्ग जगातील ५० मोठ्या शहरांपैकी एक असून दक्षिण आफ्रिकेतील तीन जागतिक महानगरांपैकी एक आहे. दक्षिण आफ्रिकेचे संवैधानिक न्यायालय या शहरात आहे.

विटवॉटर्सरँड टेकड्यांच्या मध्यात वसलेल्या जोहान्सबर्गमध्ये सोने व हिऱ्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. ओ.आर. टॅंबो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.

२००७ च्या अंदाजानुसार महानगराची लोकसंख्या ३८,८८,१८० इतकी आहे. वेस्ट रँड, सोवेटो आणि लेनासिया ही उपशहरे धरल्यास ही संख्या १,०२,६७,७०० इतकी आहे. १,६४५ किमी२ भागातील ही लोकसंख्या २,३६४ प्रती किमी२ इतक्या घनतेने राहते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →