हो चि मिन्ह सिटी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हो चि मिन्ह सिटी

हो चि मिन्ह शहर (व्हियेतनामी: Thành phố Hồ Chí Minh, उच्चार ;; जुने नाव: सैगॉन, फ्रेंच: Saigon) हे व्हियेतनाम देशातील सर्वांत मोठे शहर व देशाचे आर्थिक केंद्र आहे. हे शहर दक्षिण व्हियेतनाममध्ये सैगॉन नदीच्या काठावर दक्षिण चीन समुद्र किनाऱ्याच्या जवळ वसले आहे. हो चि मिन्ह महानगराची लोकसंख्या सुमारे ९० लाख आहे. हनोई ही व्हिएतनामची राजधानी असली तरीही हो चि मिन्ह सिटी हेच देशातील प्रमुख शहर मानले जाते.

१७व्या शतकापासून ख्मेर राजवटीचा भाग राहिलेले सैगॉन १९व्या शतकामध्ये फ्रेंचांच्या अधिपत्याखाली आले. इ.स. १९०२ पर्यंत सैगॉन फ्रेंच इंडोचीनची राजधानी होती. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या पहिल्या इंडोचीन युद्धाची परिणती व्हियेतनामच्या फाळणीत झाली व १९५५ ते १९७५ दरम्यान सैगॉन दक्षिण व्हिएतनामच्या राजधानीचे शहर राहिले. सेनापती हो चि मिन्ह ह्याच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट उत्तर व्हिएतनामने व्हिएतनाम युद्धात अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या दक्षिण व्हियेतनामचा पराभव केला व सैगॉन पुन्हा अखंड व्हियेतनामचा भाग बनले. १ मे १९७५ रोजी सैगॉनचे नाव बदलून हो चि मिन्ह सिटी असे ठेवले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →