व्हियेतनाम

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

व्हियेतनाम

व्हियेतनाम (लेखनभेद: व्हिएतनाम) हा आग्नेय आशियातील एक देश आहे. व्हिएतनामच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस लाओस व कंबोडिया हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चीन समुद्र आहेत. २०२० नुसार, सुमारे ९.७८ कोटी लोकसंख्या असलेला व्हिएतनामचा ह्या बाबतीत जगात १३ वा तर आशिया खंडात आठवा क्रमांक आहे. हनोईही व्हिएतनामची राजधानी तर हो चि मिन्ह सिटी (जुने नाव: साईगोन) हे येथील सर्वात मोठे शहर आहे. बौद्ध धर्म हा या देशाचा मुख्य धर्म असून देशाची ८५% (८.३१ कोटी) लोकसंख्या ही बौद्ध आहे.

इ.स. ९३८ साली साम्राज्यवादी चीनपासून व्हिएतनामला स्वातंत्र्य मिळाले. १९व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी ह्या भूभागावर आक्रमण करून येथे फ्रेंच इंडोचीन ही वसाहत निर्माण केली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर झालेल्या पहिले इंडोचीन युद्धामध्ये हो चि मिन्हच्या नेतृत्वाखाली व्हिएतनामी सैन्याने फ्रान्सचा पराभव केला. १९५४ साली व्हिएतनामचे उत्तर व दक्षिण असे दोन तुकडे करण्यात आले. मात्र एकत्रीकरणावरून पुन्हा झालेल्या व्हिएतनाम युद्धात उत्तरेची सरशी झाली व १९७६ साली व्हिएतनाम पुन्हा एकदा एकसंध बनला. पुढील एक दशक सोव्हिएत संघाच्या छत्रछायेत दारिद्र्य व एकाकीपणात काढल्यानंतर व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाने अनेक आर्थिक व राजकीय सुधारणा हाती घेतल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →