जूड लॉ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जूड लॉ

डेव्हिड जूड हेवर्थ लॉ (२९ डिसेंबर, १९७२ - ) एक इंग्लिश अभिनेता आहे. याने अनेक ब्रिटिश दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. याआधी त्याने नाटकांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर अँथनी मिंघेलाच्या द टॅलेंटेड मिस्टर रिप्ले (१९९९) मधील भूमिकेसाठी त्याला ओळख मिळाली, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार मिळाला आणि अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

स्टीव्हन स्पीलबर्गचा एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स (२००१), सॅम मेंडेसचा रोड टू परडिशन (२००२), मिंघेलाचा कोल्ड माउंटन (२००३), क्लोजर (२००४) आणि द हॉलिडे (२००६) हे त्यांचे काही चित्रपट गाजले. शेरलॉक होम्स (२००९) आणि शेरलॉक होम्स: अ गेम ऑफ शॅडोज (२०११) मध्ये त्यांनी डॉ. वॉटसनची भूमिका साकारली. फॅन्टास्टिक बीस्ट्स: द क्राइम्स ऑफ ग्रिंडेलवाल्ड (२००८) आणि फॅन्टास्टिक बीस्ट्स द सिक्रेट्स ऑफ डंबलडोर (२०२२) मधील लहानपणीचा आल्बस डंबलडोर यासह त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →