बेनेडिक्ट कंबरबॅच

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बेनेडिक्ट कंबरबॅच

बेनेडिक्ट टिमोथी कार्लटन कंबरबॅच (जन्म १९ जुलै १९७६) हा एक इंग्रजी अभिनेता आहे जो पडद्यावर आणि रंगमंचावरील त्याच्या कामासाठी ओळखल्या जातो. त्याला एक बाफ्टा अवॉर्ड, एक प्राइमटाइम एमी अवॉर्ड आणि लॉरेन्स ऑलिव्हिये अवॉर्डसह विविध पुरस्कार मिळाले आहेत व दोन अकादमी पुरस्कार आणि चार गोल्डन ग्लोबसाठी नामांकन मिळाले आहे. २०१४ मध्ये, टाईम मासिकाने त्यांना जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नाव दिले.

कंबरबॅचच्या दूरचित्रवाणी कार्यामध्ये हॉकिंग (२००४) टिव्ही चित्रपटातील स्टीफन हॉकिंगच्या भूमिकेचा समावेश आहे. २०१० ते २०१७ या कालावधीत शेरलॉक या मालिकेत शेरलॉक होम्सच्या भूमिकेसाठी त्याला व्यापक ओळख मिळाली, ज्यासाठी त्याने उत्कृष्ट मुख्य अभिनेत्यासाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला.

चित्रपटांमध्ये, द इमिटेशन गेम (2014) मधील ॲलन ट्युरिंग आणि द पॉवर ऑफ द डॉग (2021) मधील अस्थिर राँचरच्या भूमिकेसाठी कंबरबॅचला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील डॉ. स्टीफन स्ट्रेंज या पात्राच्या भूमिकांसाठी ते ओळखले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →