इद्रिस एल्बा

या विषयावर तज्ञ बना.

इद्रिस एल्बा

इद्रिसा अकुना एल्बा (६ सप्टेंबर, १९७२:हॅकनी, लंडन, इंग्लंड - ) एक इंग्रजी अभिनेता, रॅपर, गायक आणि डीजे आहे. हा लंडनमधील नॅशनल यूथ म्युझिक थिएटरचे माजी विद्यार्थी असून तो दूरचित्रवाणी आणि चित्रपटांतून अभिनय करतो.

एल्बा एचबीओ मालिका द वायर (२००२-०४), बीबीसी वन मालिका ल्यूथर (२०१०-१९) या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये तसेच नेल्सन मंडेला: लाँग वॉक टू फ्रीडम या चरित्रात्मक चित्रपटातील नेल्सन मंडेला यांच्या भूमिकांसाठी ओळखला जाते. ल्यूथरसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि उत्कृष्ट मुख्य अभिनेत्यासाठी प्राइमटाइम एम्मी पुरस्कारासाठी प्रत्येकी चार नामांकने मिळाली आणि एक पुरस्कार मिळाला.

याशिवाय एल्बा अमेरिकन गँगस्टर (२००७), ऑब्सेस्ड (२००९), प्रॉमेथियस (२०१२), पॅसिफिक रिम (२०१३), बीस्ट्स ऑफ नो नेशन (२०१५) मध्ये दिसला. बीस्ट्स ऑफ नो नेशन मधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब आणि बाफ्टा नामांकन मिळाले. मॉलीझ गेम (२०१७). द हार्डर दे फॉल (२०२१), हेड्स ऑफ स्टेट (२०२५) यांतही त्याने भूमिका केल्या, एल्बाने झूटोपिया, द जंगल बुक, फाइंडिंग डोरी आणि सोनिक द हेजहॉग २ (२०२२) मधील पात्रांना आवाज दिला आहे. त्याने यार्डी (२०१८) मधून दिग्दर्शनात पदार्पण केले.

२०१६ मध्ये एल्बाचे नाव जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या टाइम १०० यादीत होते. मे २०१९ पर्यंत, त्याच्या चित्रपटांनी ९.८ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त कमाई केली होती. एल्बा सर्वोच्च २० सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयाव्यतिरिक्त, एल्बा डीजे बिग ड्रीस किंवा इद्रिस या नावाने डीजे म्हणून आणि आर अँड बी गायक म्हणून काम करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →