जास्मिन पाओलिनी

या विषयातील रहस्ये उलगडा.

जास्मिन पाओलिनी

जास्मिन पाओलिनी (४ जानेवारी, १९९६:बान्यी दि लुक्का, टस्कनी, इटली - ) एक इटालियन टेनिस खेळाडू आहे. ही १५ जुलै, 2024 रोजी जागतिक क्रमवारीत एकेरीमध्ये ५व्या क्रमांकावर आणि दुहेरीत १३व्या क्रमांकावर होती. ही इटलीतील पहिल्या क्रमांकाची टेनिस खेळाडू होती.

पाओलिनी २०२४ फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन स्पर्धांमध्ये उपविजेती होती.

पाओलिनीचा जन्म इटलीच्या कास्तेलनुओव्हो दि गारफान्याना येथे झाला. तिचे लहानपणटस्कनी मधील येथे कॅरारा आणि फोर्ते देई मार्मी येथे गेले. तिचे वडील उगो, इटालियन आहेत आणि तिची आई जॅकलिन, पोलिश आणि घानाई वंशाची आहे. जॅकलिन मूळची वूत्श शहराची आहे. जास्मिनची आजी ती पोलिश आहे तर तिचे आजोबा घानाचे आहेत.. तिचा भाऊ विल्यम हा देखील टेनिस खेळतो.

वयाच्या पाचव्या वर्षी तिला तिच्या वडिलांनी आणि काकांनी टेनिसची ओळख करून दिली होती. त्यानंतर तिनेबान्यी दि लुक्का येथील मिराफियुम टेनिस क्लबमध्ये प्रशिक्षण घेतले. वयाच्या १५ व्या वर्षी ती पुढील प्रशिक्षणासाठी तिरेनिया येथे गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →