पाउला बदोसा जिल्बेर्त (१५ नोव्हेंबर, १९९७:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही एक स्पॅनिश व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही २५ एप्रिल, २०२२ रोजी डब्ल्यूटीए एकेरी क्रमवारीत २ आणि दुहेरीत १२४ व्या क्रमांकावर होती.
बदोसाचा जन्म न्यू यॉर्कमधील मॅनहॅटन येथे स्पॅनिश मिरेया जिल्बेर्त बारो आणि जोसेप बदोसा कोदोलार यांच्या घरी झाला. हे दोघेही मॉडेल आहेत. पाउला सात वर्षांची असताना तिचे कुटुंब बार्सेलोनाला परत गेले. तेथे तिने टेनिस खेळायला सुरुवात केली. वयाच्या १४ व्या वर्षी टेनिसमध्ये कारकीर्द करण्यासाठी ती व्हॅलेन्सियाला गेली आणि १७ व्या वर्षी ती बार्सिलोनाला परतली.
बदोसा स्पॅनिश व्यतिरिक्त कॅटलान, इंग्लिश आणि थोडीशी फ्रेंच भाषा बोलते. तिची आवडती स्पर्धा यूएस ओपन आहे. तिचे लहानपणीचे आदर्श राफेल नदाल आणि मारिया शारापोव्हा होते. बदोसा सिमोना हालेपची खूप मोठी चाहती आहे.
बदोसाला लहान असताना तिच्या पालकां प्रमाणे एक मॉडेल व्हायचे होते. तिला नैराश्य आणि काळजी यांचा सामना करावा लागला आहे.
पाउला बदोसा
या विषयातील रहस्ये उलगडा.