जागृती (चित्रपट)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

जागृती हा सत्येन बोस दिग्दर्शित १९५४चा बॉलिवूड चित्रपट आहे. हा १९४९ च्या बंगाली चित्रपट परिबर्तन वर आधारित होता जो बोस यांनीच दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात राजकुमार गुप्ता, अभि भट्टाचार्य आणि रतन कुमार मुख्य भूमिकेत आहेत. १९५६ मध्ये ३र्या फिल्मफेर अवॉर्ड्समध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला होता आणि आपल्या अभिनयाबद्दल भट्टाचार्य यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला होता.

हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१६ रोजी भारतीय चित्रपट महोत्सव संचालनालय आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे सादर केलेल्या स्वातंत्र्यदिनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये ७० वा भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित केले गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →