मासूम हा १९६० चा सत्येन बोस दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यात अशोक कुमार, सरोष इराणी, हनी इराणी, घनश्याम नायक आणि मोहन छोटी यांच्या भूमिका आहेत. यासाठी पटकथालेखिका रुबी सेन यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेर पुरस्कार मिळाला. चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या फिल्मफेर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते. रॉबिन बॅनर्जीच्या संगीतामध्ये "नानी तेरी मोरनी को मोर ले गये" आणि "हमें उन राहों पर चलना है जहाँ गिरना और संभालना है" या गाण्यांचा समावेश आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मासूम (१९६० चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.