जगन्नाथ वाणी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

डॉ. जगन्नाथ वाणी (जन्म : नाशिक, १० सप्तेंबर, इ.स. १९३४; - कॅलगरी-कॅनडा, ५ मे, इ.स. २०१७) हे स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (SAA) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते.

जगन्नाथ वाणी यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई केवळ १४ वर्षांची होती. त्यांना स्वतःच्या वयाच्या दहाव्या वर्षी, आणखी तीन लहान भावंडे होती. प्राथमिक शाळेत, इयत्ता तिसरीत शिकत असतांना कुटुंबीयांच्या काही मित्रमंडळींनी जगन्नाथाच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्या काळात, वाणी परिवारात आणि त्यांच्या सभोवतालच्या समाजात बालविवाह सर्रास चालत. सुदैवाने जगन्नाथ वाणींच्या वडिलांनी अशा प्रथेस खंबीरपणे विरोध केला आणि मुलांच्या शिक्षणावर भर दिला.

१९५४ साली मुंबई बोर्डात मॅट्रिक परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांमधे मराठी, कानडी, गुजराती असे विद्यार्थी असत. त्या वर्षींच्या शालान्त परीक्षेत मुंबई इलाख्यातून एक लाख विद्यार्थ्यांतून उत्तीर्ण झालेल्यांमधे पहिल्या १५ क्रमांकाच्या गुणवत्ता यादीत १४ विद्यार्थी कानडी व गुजराती भाषक होते. एकमेव मराठी भाषक नांव ९व्या क्रमांकावर असलेल्या जगन्नाथ वाणींचे होते.

शालान्त परीक्षेतील भरघोस यशानंतरही नातलग व गावकऱ्यांमार्फत जगन्नाथ वाणींच्या लग्नासाठी अधूनमधून प्रस्ताव येत होतेच. परंतु त्यांच्या शाळेतील शिक्षकांनीच ही लगीनघाई रोखली. १९५५-१९५९ या कालावधीत वाणी फर्ग्युसन महाविद्यालय व पुणे विद्यापीठातून बी.एस्‌सी. ऑनर्स झाले. त्यानंतर त्यांचे लग्न धुळे जिल्ह्यातील नामपूर गांवचे नरहर गोपाळशेट यांची कन्या कमलिनी (पूर्वाश्रमीची कृष्णा) हिच्याशी ३१मे १९५९मधे झाले. १९६० च्या एप्रिलमधे त्यांनी पुणे विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात एम.एस्‌‌सी.ची पदवी संपादन केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →