डॉ. श्रीराम अभ्यंकर (जुलै २२, इ.स. १९३० - नोव्हेंबर २, इ.स. २०१२) हे अमेरिकेत राहणारे भारतीय-मराठी गणितज्ञ होते.
डॉ. श्रीराम अभ्यंकरांचा जन्म २२ जुलै १९३० रोजी भारतातील मध्य प्रदेशात उज्जैन येथे झाला. त्यांच्या वडलांचे नाव प्रा.शंकर केशव अभ्यंकर. ते गणिताचे प्राध्यापक होते. त्यांनी चार गणितज्ञांवर एक पुस्तक लिहिले आहे.
अभ्यंकरांचे शालेय आणि इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण ग्वाल्हेर येथे झाले. त्यांनी १९५१ साली मुंबईच्या 'इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स' मधून बी.एस.सी.(गणित) ही पदवी मिळवली. मध्य प्रदेश सरकारच्या आर्थिक साहाय्याने त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांनी एका वर्षातच १९५२ साली या विद्यापीठाची गणितातील ए.एम. ही सर्वोच्च पदवी मिळवली.
डॉ. श्रीराम अभ्यंकर हे प्रज्ञावंत गणिती होते. ते उत्तम शिक्षक, मराठी भाषाप्रेमी आणि पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक होते. अभ्यंकर अमेरिकेतील परड्यू विद्यापीठात गणित, संगणक विज्ञान व औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. त्यांचे बीजभूमिती या विषयात विशेष नैपुण्य होते.
श्रीराम अभ्यंकर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.