रिचर्ड ई. टेलर (२ नोव्हेंबर, इ.स. १९२९ – २२ फेब्रुवारी, इ.स. २०१८) हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म कॅनडातील एका छोटय़ाशा गावात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाला. युद्धानंतर त्यांचे मेडिसीन हाट नावाचे अल्बर्टातील गाव जैविक व रासायनिक युद्धतंत्राचे संशोधन केंद्र बनले होते. १९४५ मध्ये अणुबॉम्बचा वापर झाला त्या वेळी टेलर यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवले. विज्ञान व गणितात त्यांची गती पाहून शिक्षकांनी त्यांना अल्बर्टा विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला, तेथे त्यांना भौतिकशास्त्रात एमएस करता आले. १९९२ मध्ये ते स्टॅनफर्डला आले , हाय एनर्जी फिजिक्स लॅबमध्ये काम करू लागले. फ्रान्समधील ओरसे येथील त्वरणकाच्या उभारणीसाठी त्यांनी स्वतःची पीएच.डी. तीन वर्षे लांबणीवर टाकली होती. १९६१ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया येथे लॉरेन्स रॅडिएशन लॅब येथे काम केले, पण नंतर ते परत स्टॅनफर्ड लिनियर अॅक्सिलरेटर सेंटर येथे परत आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रिचर्ड ई. टेलर
यामागील विज्ञान आणि इतिहास.