प्रभा अत्रे (१३ सप्टेंबर, १९३२ - १३ जानेवारी,२०२४) या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका होत्या. शनिवारी पहाटे, ९२व्या वर्षी त्यांचे निधन झाले. डॉ. अत्रे यांना पहाटे श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी वाटेतच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
डॉ. प्रभा अत्रे यांनी ११ पुस्तके (एकाच मंचावरून) प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी १८ एप्रिल २०१६ रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे हिंदी आणि इंग्रजीमध्ये संगीतावरील ११ पुस्तकांचे प्रकाशन केले.
अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जातात. त्या पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या आहेत. भारत सरकारने त्यांना संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० मध्ये "पद्मश्री" आणि २००२ मध्ये "पद्मभूषण" पुरस्काराने सन्मानित केले. हे पुरस्कार भारतातील अनुक्रमे चौथ्या तिसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत. २०२२ मध्ये "पद्मविभूषण" देऊन त्यांचा गौरव केला. हा भारतरत्न नंंतर सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
प्रभा अत्रे
थोडक्यात पण महत्त्वाचे.