वसंतराव राजूरकर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

वसंतराव राजूरकर (जन्म : ग्वाल्हेर, २४ एप्रिल, इ.स. १९३२ - हैदराबाद, १२ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे एक ग्वाल्हेर घराण्याचे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक होते. गायिका मालिनी राजूरकर या त्यांच्या पत्‍नी. त्यांना दोन कन्या आहेत.

वसंतरावांनी गायन शाळेत संगीत विशारद केले. पुढे त्यांचे काका (गायक गोविंदराव राजूरकर) प्राचार्य असलेल्या अजमेरच्या संगीत महाविद्यालयात वसंतरावांनी पुढचे शिक्षण घेतले. पं. राजाभैय्या पूंछवाले यांच्या घरी दर गुरुवारी होणाऱ्या बैठकीमध्ये वसंतराव तंबोऱ्याची साथ करताकरता गाऊ लागले.

पुढे हैदराबाद येथील म्युझिक कंपनीमध्ये नोकरी स्वीकारून वसंतराव १९५४ मध्ये तेथेच स्थायिक झाले. अजमेर येथे काकांकडे गेल्यानंतर त्यांची शिष्या मालिनी वैद्य यांच्याशी वसंतरावांचा परिचय झाला आणि पुढे हे दोघेही विवाहबद्ध झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →