चेस्टर

या विषयातील रहस्ये उलगडा.

चेस्टर

चेस्टर हे इंग्लंडच्या चेशायर काउंटी मधील शहर आहे. हे वेल्स सीमेजवळ डी नदीवर वसलेले आहे.२०२१मध्ये येथील लोकसंख्या ९२,७६० इतकी होती.

चेस्टर शहराचीची स्थापना इ.स. ७९ मध्ये सम्राट वेस्पाशियनच्या कारकिर्दीत डीव्हा व्हिक्ट्रिक्स नावाचा रोमन किल्ला म्हणून झाली. रोमन ब्रिटनमधील मुख्य सैन्य छावण्यांपैकी एक असलेल्या या किल्ल्याभोवती कालांतराने एक मोठी नागरी वस्ती बनली. ६८९ साली मर्सियाचा राजा एथेलरेड याने येथे चर्च बांधल्याची नोंद आहे. इंग्लंडवरील नॉर्मन आक्रमणात चेस्टर हे नॉर्मन ताब्यात गेलेल्या शेवटच्या शहरांपैकी एक होते. विल्यम द कॉन्कररने शहर आणि जवळच्या वेल्श सीमेवर वर्चस्व राखण्यासाठी किल्ला बांधण्याचा आदेश दिला. १५४१मध्ये चेस्टरला शहराचा दर्जा देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →