चेर्नोबिल दुर्घटना हा आजवर घडलेला जगातील सर्वात विनाशकारी अणुऊर्जा अपघात आहे. एप्रिल २६ १९८६ रोजी तत्कालीन सोव्हिएत संघामधील (आजच्या घडिला युक्रेनमधील) चेर्नोबिल अणुऊर्जा विद्युत केंद्राच्या ४ क्रमांकाच्या अणुभट्टीमधील एका चाचणीदरम्यान झालेल्या स्फोटामध्ये भयानक अण्विक वाफांची गळती सुरू झाली व आजूबाजूच्या मोठ्या भागामध्ये ह्या वाफा पसरल्या. ही गळती थांबवण्याच्या व त्यामुळे लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये ५६ कर्मचारी व कामगारांचा मृत्यू झाला. परंतु सर्वदूर पसरलेल्या अण्विक वाफांच्या संसर्गातून झालेल्या कर्करोगामुळे सुमारे ४,००० लोक मृत्यूमुखी पडले असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
ह्या दुर्घटनेमुळे येथील परिसर कायमचा प्रदुषित झाला आहे व डिसेंबर २००० सालापर्यंत ३.५ लाख नागरिकांचे स्थलांतर पूर्ण करण्यात आले.
चेर्नोबिल दुर्घटना
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.