चार्ल्सटन (साउथ कॅरोलिना)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

चार्ल्सटन (साउथ कॅरोलिना)

चार्ल्सटन अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील मोठे शहर आहे. राज्यातील सगळ्यात जुनी युरोपियन वसाहत असलेले हे शहर चार्लस्टन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२०,०८३ होती. तर महानगराची लोकसंख्या अंदाजे ७.१२,२२० होती.

हे शहर इ.स. १६७०मध्ये पहिल्यांदा चार्ल्स टाउन या नावाने वसवले गेले. इंग्लंडचा त्यावेळचा राजा चार्ल्स दुसऱ्याचे हे नाव त्यावेळी दिले गेले होते. १७८३मध्ये हे नाव बदलून चार्ल्सटन केले गेले. इ.स. १६९०मध्ये हे शहर अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर होते. १८४० च्या जनगणनेपर्यंत हे शहर अमेरिकेतील मोठ्या दहा शहरांपैकी एक होते.

चार्ल्सटन ॲशली नदी आणि कूपर नदीच्या संगमातून तयार झालेल्या खाडीजवळ वसलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →