ग्रँड बुद्ध किंवा भव्य बुद्ध (चिनी: 灵山大佛; इंग्लिश: The Grand Buddha) हा चीनच्या जिआंगसू प्रांतात माशान जवळील लिंगशान पर्वताच्या दक्षिणेस, वूशी शहरात स्थित असलेला एक भव्य पुतळा आहे. तो चीन आणि जगभरातील सर्वात मोठ्या बुद्ध मूर्तींपैकी एक आहे. हा जगातील दहावा सर्वाधिक उंच पुतळा आहे तर पाचवा सर्वाधिक उंच बुद्धपुतळा आहे.
८८ मीटर पेक्षा जास्त उंचीचा व ७०० टन पेक्षा जास्त वजनाचा हा कांस्य धातूचा पुतळा अमिताभ बुद्धाचा आहे. हा इ.स. १९९६ च्या अखेरीस पूर्ण झाला.
इ.स. २००८ मध्ये, "पाच-सिग्नेट" पॅलेस आणि एक ब्रह्मा पॅलेस हे ग्रँड बुद्ध पुतळ्याच्या आग्नेय बाजूला बांधण्यात आले होते.
ग्रँड बुद्ध (लिंगशान)
या विषयातील रहस्ये उलगडा.