लेशान जायंट बुद्ध

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

लेशान जायंट बुद्ध

लेशान जायंट बुद्ध किंवा लेशानचे भव्य बुद्ध (चीनी: 乐山 大佛; इंग्रजी: Leshan Giant Buddha) हा ७१ मीटर (२३३ फूट) उंच दगडाचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा आहे. हा जगातील सर्वात उंच दगडाचा पुतळा आहे.

चीनच्या लेशान शहराशेजारच्या डोंगरातील बसलेल्या अवस्थेतील ही भव्य बुद्धमूर्ती इ.स. ७१३ आणि इ.स. ८०३ दरम्यान (तांग राजघराण्याच्या काळात) एमेई पर्वताच्या एका उभ्या कड्यांमध्ये कोरीवकाम करून बनवली गेली. अजूनही सुस्थितीत असलेली ही मूर्ती बसलेल्या अवस्थेतील बुद्धांची जगातील सर्वात उंच मूर्ती आहेच पण प्राचीन काळातील सर्वात उंच एकाष्म शिल्प म्हणूनही तिला ओळखले जाते. या मूर्तीच्या समोरच, तिच्या पायाजवळ मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचा संगम आहे. इ.स. १९९६ पासून या स्थळाला UNESCO World Heritage Siteचा दर्जा मिळाला आहे. मूर्तीच्या आजूबाजूची १८ चौरस किमी जागा ऐतिहासिक संरक्षित क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक मूर्ती आणि कोरीवकामे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →