गोर बंजारा साहित्य अकादमी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

"गोर बंजारा साहित्य अकादमी" बंजारा साहित्य संस्कृती व कलेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलेली एक संस्था आहे. हिंदी, सिंधी, गुजराती साहित्य अकादमीच्या धर्तीवर बंजारा भाषा साहित्य संस्कृती व कलेच्या संवर्धनासाठी स्वतंत्रपणे गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन करण्याची संकल्पना प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी सर्वप्रथम मांडली होती. गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन व्हावी यासाठी पहिल्यांदा भक्तीधाम पोहरादेवी येथे सन २०१५ मध्ये महत्वपूर्ण सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते. पुढे सन २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा अकादमीची अधिकृत घोषणा केली. साहित्यिक -भाषिक आदान - प्रदानातून राज्याचा सांस्कृतिक विकास साधून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या हेतूने शासनाने गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन करण्याचा निर्णय अखेर १६ मार्च २०२४ रोजी सांस्कृतिक मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी घेतला. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री संजय राठोड व माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचे पाठबळ लाभले होते. गोर बंजारा साहित्य अकादमीची संकल्पना व या संकल्पनेशी समाजाला जोडण्याची पायाभरणी प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांची असल्याने ते गोर बंजारा साहित्य अकादमीचे जनक मानले जातात. गोर बंजारा साहित्य अकादमीची स्थापना बंजारा भाषा साहित्य आणि संस्कृती संवर्धनासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →