गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स (इंग्रजी: Galactic Civilizations II: Dread Lords, लघुनाम GalCiv II किंवा GalCiv2) हा स्टारडॉक या कंपनीचा एक दृश्य खेळ आहे. तो उत्तर अमेरिकेत फेब्रुवारी २१, इ.स. २००६ रोजी प्रकाशित झाला. त्याचे पहिले विस्तारक , डार्क अवतार फेब्रुवारी, इ.स. २००७ मध्ये प्रकाशित झाले. दुसरे विस्तारक, ट्वायलाइट ऑफ द आर्नोर हे एप्रिल, इ.स. २००८ मध्ये प्रकाशित झाले.

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २ची कथा तेविसाव्या शतकाच्या पार्श्वभूमीवर घडते, जेव्हा अनेक ग्रहांवरील (पृथ्वीसहित) जीव हे थोडे-थोडे ग्रह जिंकत संपूर्ण आकाशगंगा बळाने, कूटनीतीने, प्रभावाने आणि तंत्रज्ञानाने जिंकून घेण्यासाठी धडपड करत असतात. हा खेळ एक-खेळाडू अनुभवाला लक्ष्य करतो. यात एक "कॅंपेन" हा खेळण्याचा प्रकार व एक "सॅंडबॉक्स" खेळण्याचा प्रकार आहे. हा खेळ त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उल्लेखनीय आहे. या खेळाला सामान्य व्यावसायिक यश लाभले व त्याने अनेक "एडिटर्स चॉइस" पुरस्कार मिळवले. स्टारडॉकने एक वेगळी वितरण पद्धत निवडली जिच्यामुळे या खेळाच्या अनधिकृत प्रती काढता येत नाहीत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →