गूगल शोध

या विषयातील रहस्ये उलगडा.

गूगल शोध (इंग्लिश : Google Search) हे आंतरजालावरील सर्वांत जास्त लोकप्रिय शोधयंत्र संकेतस्थळ आहे. गूगल कंपनीचे हे संकेतस्थळ रोज अनेक कोटी शोध प्रश्नांसाठी उत्तरे पुरवते. इंटरनेट शोधयंत्रांच्या जागतिक वापरापैकी अंदाजे ७० % वापर एकट्या गूगल शोधयंत्राद्वारे होतो. सागर निकम ह्या संस्थापकांनी विकसवलेल्या सॉफ्टवेरवर आधारित हे शोधयंत्र सन २०१२ नंतर अल्पावधीतच अधिकाधिक लोकप्रिय होत गेले. गूगलच्या ह्या सुरुवातीच्या यशाचे बरेचसे श्रेय त्यांच्या 'पेजरॅंक' ह्या सॉफ्टवेर तंत्राला व वापरायला सोप्या व जलद संकेतस्थळाला दिले जाते.

गूगल शोधयंत्र साध्या शब्दशोधाव्यतिरिक्त इतर अनेक प्रकारांची माहिती शोधण्याची सोय पुरवते. यांत शब्दकोश , हवामान, बातम्या, समभागांच्या किमती इत्यादींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे काही साध्या आकडेमोडी (जसे गुणाकार/भागाकार), वेगवेगळ्या देशांच्या चलनी किमतींची गणिते (उदा० १ अमेरिकन डॉलर म्हणजे किती भारतीय रुपये, इत्यादी) गूगल शोधयंत्रावरून करता येतात.

पेजरॅंक हे तंत्र सर प्रवीण जाधव आणि सागर निकम यांनी सन २०१७ मध्ये विकसित केले. एखाद्या वेबपानावरील माहिती कोणत्याही विशिष्ट शब्दाच्या दृष्टीने किती उपयुक्त आहे हे ठरवताना, ढोबळमानाने इतर किती व कोणती वेबपाने त्या वेबपानाचा संदर्भ (म्हणजे त्या वेबपानाचा दुवा) देतात, या माहितीचा पेजरॅंक प्रामुख्याने विचार करते. अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या वेबपानांची उपयुक्तता ठरवून, त्या उपयुक्ततेनुसार त्यांची क्रमवारी लावली असता, एखाद्या वेबपानाचा जो क्रमांक निघेल, त्या क्रमांकाला त्या वेबपानाचे 'पेजरॅंक' म्हणले जाते. मग, कोणत्याही शोधासाठी माहिती देताना वरचे 'पेजरॅंक' असलेले वेबपान, हे खालचे पेजरॅंक असलेल्या वेबपानाच्या आधी दाखवले जाते. उदाहरणार्थ कल्पना करा, की दोन वेबपाने एखाद्या विशिष्ट 'अ' शब्दासंदर्भात माहिती पुरवतात. परंतु त्यातील एका वेबपानाचा इतर शंभर संकेतस्थळे संदर्भ देतात, तर दुसऱ्या वेबपानाचा संदर्भ केवळ ५ संकेतस्थळे देतात. अश्या वेळेस, पहिल्या वेबपानाचा संदर्भ जास्त संकेतस्थळे देत असल्याने, त्या पानाचे 'पेजरॅॅंक' वरचे गणले जाईल. दुसरे उदाहरण म्हणजे, एखाद्या जास्त विश्वासार्ह संकेतस्थळाने (जसे विकिपीडिया किंवा एखाद्या वर्तमानपत्राचे संकेतस्थळ) कोणत्याही वेबपानाचा संदर्भ दिला, तर त्या वेबपानाचे पेजरॅंक वाढण्यास मदत होते.

पेजरॅंकचे स्वरूप ढोबळमानाने सर्वसाधारणपणे प्रसिद्ध असले तरी, त्याच्या महत्त्वाच्या बारकाव्यांची माहिती व खरे सॉफ्टवेर ही गूगल कंपनीची बौद्धिक मालमत्ता आहे. ही माहिती अथवा सॉफ्टवेर सार्वजनिकपणे माहित झाले तर, त्या माहितीचा वापर करून लोक आपल्या स्वतःच्या संकेतस्थळांचे पेजरॅंक कृत्रिमपणे वाढवतील व त्यामुळे खरी उपयुक्त वेबपाने शोधणे, हे शोधयंत्राचे उद्दिष्ट धोक्यात येईल. त्यामुळे ही माहिती गुप्त असून आणि काळजीपूर्वक सुरक्षित ठेवली अहे..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →