मोझिला फायरफॉक्स

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मोझिला फायरफॉक्स (इंग्रजी: Mozilla Firefox) हे मोझिला कॉर्पोरेशन कंपनीने विकसित केलेला आंतरजाल न्याहाळक अथवा विचरक (इंटरनेट ब्राउझर) प्रकारातील सॉफ्टवेर आहे. हे मराठी भाषेत उपलब्ध असलेले सॉफ्टवेर आहे. मार्च २०११ मध्ये मोझिला फायरफॉक्स जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वापरला जाणारा आंतरजाल न्याहाळक आहे. या न्याहाळकास इंडोनेशिया, जर्मनी व पोलंडमध्ये बरेच यश मिळाले आहे, तेथे तो अनुक्रमे ६७%, ६०% व ४७% वापरला जातो. या शिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा एकमेव न्याहाळक मराठी भाषेतही उपलब्ध आहे. याचे मराठीत संपूर्ण भाषांतर केले गेले आहे.

तांत्रिकदृष्ट्या, फायरफॉक्स मोझिला कॉर्पोरेशन कंपनीच्या गेको लेआउट इंजिन या एच.टी.एम.एल. रेंडरर लेआउट इंजिनाचा वापर करतो. फायरफॉक्स मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स, अ‍ॅपल मॅक ओएस एक्स व युनिक्स प्रणालीशी साधर्म्य असणाऱ्या इतर काही संगणकप्रणाल्यांवर चालतो. फायरफॉक्सची सर्वांत नवीन आवृत्ती ५.० आहे, ती जुलै ११, २०११ पासून उपलब्ध आहे. फायरफॉक्स मोझिला सार्वजनिक परवाना ह्या परवान्याखाली उपलब्ध आहे, व फायरफॉक्सचा स्रोत हा मोझिला सार्वजनिक परवाना आणि जी.पी.एल. ह्या दोन्ही परवान्यांखाली उपलब्ध आहे.

फायरफॉक्साचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच खिडकीत अनेक उप-खिडक्या वापरायची सोय, अर्थात टॅब्ड ब्राउझिंग, होय. हा ब्राउझर मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या इंटरनेट एक्सप्लोररापेक्षा सुरक्षित आणि सुलभ समजला जातो व कदाचित त्यामुळे याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →